“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील विकृतांकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
Breaking News | Indurikar Maharaj: तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे आमच्या भगिनी बद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी, विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा.

Indurikar Maharaj: समाज प्रबोधनकार, कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे भन्नाट कीर्तन आणि विनोदी शैलीसाठी कायम चर्चेत असतात. इंदुरीकर महाराजांची कीर्तने लोकांना विचार करायला लावतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत आहेत. राजेशाही थाटात केलेल्या साखरपुड्यामुळे सोशल मीडियावर इंदुरीकर महाराज यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. या ट्रोलिंगमुळे व्यथित झालेल्या इंदुरीकर महाराज कीर्तन सोडण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, फेटा खाली ठेवू नका, असे आवाहन इंदुरीकर महाराजांना करण्यात आले आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत कीर्तन सेवा सुरू ठेवायची की, सोडायची याबाबत निर्णय घेणार असल्याचे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारयल झाला आहे. मुलीचा साखरपुडा, सोशल मीडियावर झालेले ट्रोलिंग आणि मुलीबाबत सोशल मीडियात आलेली प्रतिक्रिया याबद्दल इंदुरीकर महाराज त्या व्हिडिओत बोलताना पाहायला मिळत आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून इंदुरीकर महाराजांना आवाहन केले आहे.
इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी. तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झाला साहजिकच होणार, पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने सिद्ध आहात या सोशल मीडियाच्या विकृत छपरी जे माणूस नावावर कलंक आहेत यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, किर्तन, भजनातून समाजातील माता, भगिनी, बंधू साठी अत्यंत मौल्यवान कार्य केले आहे. अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केले आहे. त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका. तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री, पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसे त्यांना सदबुद्धी, चांगले विचार, चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण?
तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे आमच्या भगिनी बद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी, विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे सोशल मीडियावर वेड्याचे सौंग घेण्याकडे त्या वेड्याचे सौंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत. त्यांची विकृती ठेचून काढू. अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही. ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे. फेटा खाली ठेवायचा नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
Breaking News: Indurikar Maharaj, don’t take down the turban, ignore the perverts on social media















































