अहमदनगर: शरीर सुखाला नकार देणार्या महिलेवर धारदार शस्त्राने वार करून जखमी
Breaking News | Ahmednagar Crime: शरीर सुखाला नकार देणार्या महिलेवर धारदार शस्त्राने वार करून तिला जखमी केल्याची घटना.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शरीर सुखाला नकार देणार्या महिलेवर धारदार शस्त्राने वार करून तिला जखमी केल्याची घटना उपनगरात घडली. पीडितेवर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल सुरेश काळे व सुरेश काळे (पूर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कुणाल काळे फिर्यादीकडे गेल्या सहा महिन्यांपासून शरीरसुखाची मागणी करत होता.
फिर्यादीने त्याला नकार दिल्यानंतरही त्याने शनिवारी सायंकाळी पाच वाजता फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याचा राग येऊन त्याने धारदार शस्त्राने वार केले. यात फिर्यादी जखमी झाल्या आहे. सुरेश काळे याने देखील फिर्यादीला मारहाण करून, ‘तुला सोडणार नाही’, असा दम दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Injured by stabbing a woman with a sharp weapon for refusing body pleasure crime filed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study