Home संगमनेर संगमनेर: सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

संगमनेर: सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

Breaking News | Sangamner: आश्वी बुद्रुक येथील सराईत गुन्हेगार रवींद्र उर्फ बंटी मदने १ वर्षासाठी स्थानबद्ध .

Inn offenders confined for one year

संगमनेर: तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील सराईत गुन्हेगार रवींद्र उर्फ बंटी साहेबराव उर्फ आबासाहेब मदने (वय २१) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी १ वर्षासाठी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

मदने याने सन २०१८ ते २०२३ या कालावधीत साथीदारांच्या मदतीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे. लोकांना मारहाण करुन गंभीर दुखापत करणे. हातात घातक हत्यार घेवुन शिवीगाळ दमदाटी करणे. सार्वजनिक ठिकाणी दंगा करुन दहशत निर्माण करणे. धमकी देणे. गृह अतिक्रमण करणे. सरकारी आदेशाचा भंग करणे अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर आश्वी व घारगाव पोलिस ठाण्यात दखलपात्र ०७ व अदखलपात्र ०९ गुन्हे दाखल आहे. मदनेवर अनेकदा कारवाई करुन देखील त्याच्या वागणुकीत काही एक सुधारणा होत नसल्याने त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी आश्वीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे एमपीडीए कायद्यातंर्गत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पडताळणी करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बंटी मदनेला १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश शुक्रवारी (९ फेब्रुवारी) दिले. त्या अनुषंगाने पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांच्या पथकाने मदनेला ताब्यात घेत त्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

दरम्यान जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी दिले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

Web Title: Inn offenders confined for one year

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here