Home अकोले सीताराम गायकर यांचे जिल्हा बँक संचालकपद रद्द करण्याबाबतची तक्रार, चौकशी सुरु

सीताराम गायकर यांचे जिल्हा बँक संचालकपद रद्द करण्याबाबतची तक्रार, चौकशी सुरु

Ahmednagar: सीताराम गायकर यांचे जिल्हा बँक संचालकपद रद्द करण्याबाबत तक्रार, नवले, वैभव पिचड यांची तक्रार : उपनिबंधकांकडून चौकशी सुरू

inquiry into the cancellation of Sitaram Gaikar's post as District Bank Director has started

अहमदनगर : सीताराम गायकर यांनी नियमात बसत नसताना जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढवली असल्याने त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी तक्रार सहकार विभागाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीवर या विभागाने चौकशी सुरू केली आहे.

अकोले तालुक्यातील वाल्मीक नवले यांनी ही तक्रार केली आहे. सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार बँकेची सदस्य असलेली प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था थकबाकीत असेल तर अशा संस्थेच्या संचालकाचा प्रतिनिधी म्हणून ठराव करता येत नाही. गायकर हे सन २०१४ ते २०२० या कालावधीत जिल्हा सहकारी बँकेत चेअरमन होते. या कालावधीत ते ज्या संस्थेतून आले ती मोग्रस विविध कार्यकारी सोसायटी थकबाकीत होती. यामुळे सन २०२० २५ सालासाठी ते निवडणूक लढविण्यास अपात्र होते. मात्र त्यांनी या संस्थेचा राजीनामा देत उंचखडक खुर्द सोसायटीमार्फत स्वतःच्या नावाचा निवडणुकीसाठी ठराव केला. गायकर हे उंचखडक आहे. सोसायटीचे कर्जदार सभासद नाहीत. असे असताना ते अकोले तालुका कर्जदार मतदारसंघातून निवडून आले. ते सहकार कायद्यानुसार निवडणुकीसच पात्र नसल्याने त्यांचे संचालक पद रद्द ठरवून त्यांना अपात्र करावे अशी नवले यांची मागणी

 माजी आमदार वैभव पिचड यांनीही यासंदर्भातील तक्रार मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. या दोन्ही तक्रारींवरून विभागीय सहनिबंधक गौतम बलसाणे यांनी हे प्रकरण चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविले आहे.

माझ्याविरोधात खोडसाळपणाने हे आरोप करण्यात आले आहेत. सर्व प्रक्रिया नियमानुसार झालेली आहे. चौकशीतून ते सिद्ध होईल. आदेश आले आहेत.

– सीताराम गायकर, जिल्हा सहकारी बँक, अहमदनगर

सीताराम गायकर यांचे संचालकपद रद्द करण्याबाबतची चौकशी सुरु आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून या चौकशीचे

– गणेश पुरी, जिल्हा उपनिबंधक

Web Title: inquiry into the cancellation of Sitaram Gaikar’s post as District Bank Director has started

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here