Home नांदेड इन्स्टाग्रामवर ओळख, ओळखीचे रूपांतर प्रेमात, अत्याचार

इन्स्टाग्रामवर ओळख, ओळखीचे रूपांतर प्रेमात, अत्याचार

Breaking News | Rape Case: युवतीवर प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

Instagram acquaintance, acquaintance transformation love and Rape

नांदेड | पुणे: – इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि भेटण्यासाठी पुण्याहून नांदेडला आलेल्या युवतीवर प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये घडली आहे. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून तरुणाविरोधात तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाळू मारोती पौळ असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेने हदगाव तालुक्यात खळबळ उडालीय.

पीडित युवती ही पुणे जिल्ह्यात हडपसर येथील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी पीडित युवतीची नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील चिंचोळी येथील रहिवासी असलेल्या आरोपीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपी या युवतीला भेटण्यासाठी पुणे येथे जात होता. युवतीदेखील नांदेडला यायची. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा पीडित युवतीचा आरोप आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून तो तिला टाळत होता. संभाषणदेखील त्याने कमी केले होते.

9 मे रोजी सदर तरुणी हदगाव येथे प्रियकराला भेटण्यासाठी आली होती. फोन करून तिने आरोपी बाळूला आपण हदगावला आल्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपीने समजूत काढली, त्यानंतर रात्री कारमध्ये बसवून पांगरी शिवारात नेऊन अत्याचार केला, अशी तक्रार पीडित युवतीने तामसा पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी बाळू पौळ विरोधात ऍट्रॉसिटी आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Breaking News: Instagram acquaintance, acquaintance transformation love and Rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here