Home क्राईम ‘मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय’?; विजेच्या तारांना पकडून...

‘मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय’?; विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या

Maratha Reservation: एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Is it My Crime to be Born in Maratha Society Youth commits suicide

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आत्महत्या काही थांबायला तयार नाहीत. हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे. आदिनाथ राखोंडे (वय 27 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय?, असा त्याने उल्लेख केला आहे. जिल्ह्यातील आजरसोंडा येथील 27 वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तो उच्चशिक्षित होता. मात्र, असे असतांना नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदित्यचा सहभाग होता.

सुसाईड नोटमध्ये असलेला उल्लेख:

एक मराठा लाख मराठा…मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे.

Web Title: Is it My Crime to be Born in Maratha Society Youth commits suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here