Home अहमदनगर अहिल्यानगर: ट्रॅक्टरखाली चिरडून चिमुरडी ठार

अहिल्यानगर: ट्रॅक्टरखाली चिरडून चिमुरडी ठार

Breaking News | Ahilyanagar Accident: चिमुरड्या मुलीचा मका भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू.

little girl was crushed under a tractor and killed

राहुरी : चिमुरड्या मुलीचा मका भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील संक्रापूर येथे घडली.

अनुष्का सोमनाथ पांढरे (९) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. दरम्यान, या दुर्घटनेने संक्रापूर परिसरावर शोककळा पसरली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच गावकरी एकत्र आले. काहीवेळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळकरी चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. सध्या अनेक ठिकाणी ऊस, मका कुट्टीची डबल ट्रॉलीसह ट्रॅक्टरमधून वाहतूक होत आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या गंभीरप्रश्नी आरटीओने लक्ष घालून, डबल ट्रॉली ट्रॅक्टर्स मालकांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: little girl was crushed under a tractor and killed

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here