‘अशोक’ वर सलग सातव्यांदा मुरकुटे यांचा जलवा
श्रीरामपूर | Shrirampur: अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा विकास मंडळाने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून सलग सातव्यांदा कारखान्याची एकहाती सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले. निवडणुकीत विरोधी शेतकरी संघटनेचे अॅड. अजित काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या सर्व उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले. सुमारे दीड ते दोन हजाराच्या मताधिक्क्याने मुरकुटे यांच्यासह त्यांच्या उमेदवारांनी विरोधकांवर मात केली.
भानुदास मुरकुटे:
गेली 35 वर्षापासून अशोक सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व करताना अनेक विकासात्मक कामे करता आली. सभासदांचे हित लक्षात घेवून आतापर्यंत कामे करत आल्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत पुन्हा एकहाती सत्ता दिली. उमेदवारी मिळविण्यासाठी आमच्याकडून इच्छुकांची मोठी गर्दी होती. उमेदवारी देताना काहीजण नाराज झाले. त्या नाराजीचा फटका विजयी उमेदवारांचे मताधिक्य कमी होण्यात झाले.
Web Title: Jalwa of Murkute for the seventh time in a row on ‘Ashok’