Home Ahmednagar Live News अगोदरच कोरोनाचा हल्ला अन मग चोरांचा डल्ला, कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग  

अगोदरच कोरोनाचा हल्ला अन मग चोरांचा डल्ला, कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग  

Jamkhed Family Corona attack and theft 

जामखेड | Theft: अगोदर कुटुंबावर कोरोनाने हल्ला करत एक एक करता सर्व कुटुंब बाधित झाले. त्यातच उपचार सुरु असताना एकापाठोपाठ तिघांचा मृत्यू झाला. उरलेले कुटुंब कोरोनासोबत लढत आहे. आणि आणखी त्यात बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. घरातील किमती ऐवज चोरून नेला. त्यामुळे जामखेड तालुक्यातील जाधव कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढविला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बरेच कुटुंब उद्वस्थ झाले आहेत. जामखेड तालुक्यातील जाधव कुटुंबावर अशीच वेळ आली आहे. घरातील एकाला कोरोनाची लागण झाली आणि संपूर्ण कुटुंबच बाधित झाले. उपचार सुरु असताना कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन दिवसांनी मुलगा आणि त्यापाठोपाठ पत्नी यांचाही मृत्यू झाला. अद्याप घरातील सात व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. यातच जाधव कुटुंबावर आणखी दुसरे संकट कोसळले आहे. घर बंद असल्याचे पाहून संधी साधून चोरट्यांनी घरफोडी करत घरातील सोन्या चांदीचा ऐवज चोरून नेला आहे. नेमकी ऐवज किती गेला याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. शेजारी व नातेवाईक यांच्या मदतीने पंचनामा करून चौकशी सुरु केली आहे.

Web Title: Jamkhed Family Corona attack and theft 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here