Home क्राईम चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याला पत्नीने दिला गळफास

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याला पत्नीने दिला गळफास

Jamner husband murder from his wife

जामनेर(जळगाव) | Murder: चारीत्र्यच्या संशयावरून नेहमी भांडण करीत असल्याने संतापलेल्या पत्नीने गळफास देऊन पतीचा खून केल्याची घटना घडली आहे, ही घटना गोंडखेल ता. जामनेर येथे सोमवारी रात्री घडली.

संशियीत आरोपी पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिलीप विश्वनाथ सोनवणे हा पत्नी संगीता हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिच्याशी भांडण करीत होता. याला कंटाळून संगीता हिने त्याच्या गळ्यास दोरीने फास देत हत्या केली.

फिर्यादी आत्या कल्पना युवराज जाधव यांनी जामनेर पोलिसांत फिर्याद दिली असून संशियित पत्नी संगीता सोनवणे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव ही दिलीपची आत्या असून काल रात्री तिला भाऊ शंकर जाधव हिचा फोन आला की भाऊ हलत नाही. कल्पना शंकर सोबत दिलीपच्या घरी आल्या असता त्यांना खाटेवर दिलीप पालथा अवस्थेत आढळून आला. त्यांना वाटले की सर्पदंश झाला असेल. एवढ्यात दिलीपचा पाच वर्षाचा मुलगा यश याने त्यांना सांगितले की, आईने पप्पांना दोरीने आवळून गळफास दिला. त्यांनी पाहिले असता त्याच्या तोडातुन पाणी व कानातून रक्त येताना दिसले त्यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे.

Web Title: Jamner husband murder from his wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here