स्वत:च्या रायफलमधून गोळी झाडून जवानाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी बहिणीला केला ‘तो’ मेसेज
Breaking News Suicide: जवानाने त्याच्याकडील एसएलआर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना. मोबाइलवर एक संदेश पाठविला.
गोंदिया : बिरसी विमानतळावर कार्यरत जवानाने त्याच्याकडील एसएलआर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 17) घडली. या जवानाने आत्महत्येपूर्वी बहिणीला मेसेज केला होता. त्यानंतर त्याने जीवन संपवलं. संबंधित जवान हा रावणवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याला विमानतळावरील सेवेत संलग्न करण्यात आले होते.
मूळचे आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील रहिवासी असलेले राकेश पांडुरंग शिवणकर (वय 37) हे रावणवाडी पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी बदली होऊन आले होते. त्यांची बिरसी विमातळावर सेवा संलग्न करण्यात आली होती. राकेशने आपल्या आत्महत्येला विभागातील तीन लोक जबाबदार असल्याचा उल्लेखही बहिणीला पाठविलेल्या संदेशात केला होता. राकेश भांडारकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सोमवारी करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
सध्या राकेश भांडारकर यांच्या घरची मंडळी दुःखात असल्याने त्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. येत्या दोन दिवसांत जबाब नोंदविण्यात येतील. तसेच समांतर तपास करण्यात येईल, त्यानंतरच आत्महत्येचे मूळ कारण पुढे येईल, असे या प्रकरणाचे तपासी अधिकारी यांनी सांगितले. राकेशला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली.
बिरसी विमानतळावर रविवारी (दि. 17) तैनात असताना त्याच्याकडे असलेल्या एसएलआर रायफलने सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडली. बंदुकीतील ती गोळी त्याच्या तोंडाच्या खालून थेट डोक्यात गेली. घटनेची माहिती होताच एकच खळबळ उडाली. तत्काळ त्याला गोंदियाच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत राकेशची प्राणज्योत मालवली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी राकेशने पोलिस विभागात कार्यरत असलेल्या बहिणीला दुपारी 2.48 वाजताच्या सुमारास मोबाइलवर एक संदेश पाठविला. त्यात त्यांनी काही पोलिस राखीव असतानाही माझी ड्युटी मुद्दाम येथे लावली. त्यामुळे मी हे पाऊल उचलत असल्याचे लिहून आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Web Title: jawan commits suicide by shooting from his own rifle
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study