Home पुणे पार्किंगच्या वादातून जवानाकडून गोळीबार, एकजण गंभीर जखमी

पार्किंगच्या वादातून जवानाकडून गोळीबार, एकजण गंभीर जखमी

Breaking News | Pune Firing: पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन शेजारी राहणार्‍या तरुणाला जखमी.

jawan fired after a parking dispute, one seriously injured

पुणे : जुन्या चार चाकी गाडीच्या पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन शेजारी राहणार्‍या तरुणाला जखमी केले. येरवडा पोलिसांनी या लष्करी जवानाला अटक केली आहे.

श्रीकांत शामराव पाटील (वय ४५, रा. श्रीराम मित्र मंडळ, अशोकनगर, येरवडा) असे या लष्करी जवानाचे नाव आहे.

याबाबत दिलशाद शहानवाज मुलानी (वय ३३, रा. श्रीराम मित्र मंडळ, अशोकनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजता श्रीराम मित्र मंडळ येथे घडली. या घटनेत शहानवाज मुलानी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहानवाज मुलानी आणि श्रीकांत पाटील हे शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये जुन्या चार चाकी गाडीच्या पार्किंगवरुन वाद होत असे. गुरुवारी रात्रीही त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला. तेव्हा श्रीकांत पाटील घरातून १२ बोअरची बंदुक घेऊन आला. त्याने बंदुकीतून शहानवाज मुलानी यांच्यावर डोक्यावर गोळी मारुन गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर मुलानी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी श्रीकांत पाटील याला अटक केली आहे़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत.

Web Title: jawan fired after a parking dispute, one seriously injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here