Home Akole News उपक्रमशील शिक्षक व जेष्ठ पत्रकार सुभाष खरबस अनंतात विलीन

उपक्रमशील शिक्षक व जेष्ठ पत्रकार सुभाष खरबस अनंतात विलीन

Journalist Subhash Kharbas Passes away

अकोले | Subhash Kharbas Passes away:  येथील अगस्ति विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय, उपक्रमशील शिक्षक, सांस्कृतीक क्षेत्राची विशेष आवड़ असणारे ज्येष्ठ पत्रकार सुभाष खरबस यांचे आज पहाटे नाशिक येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

सर्वसामान्य माणसाचा आवाज जनतेपर्यंत पोचविण्याचे काम खरबस सरांनी केले. न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेकांना न्याय दिला. एक कृतिशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा अगदी हुबेहूब साकारायचे. पेशाने शिक्षक असले तरी नोकरीत फार रमले नाही . सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर उर्वरित वेळ समाजासाठी दिला असे व्यक्तिमत्त्व होणे नाही. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अकोले अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने अकोले तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली !!!!

Web Title: Journalist Subhash Kharbas Passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here