Home Suicide News Suicide: सुसाईड नोट लिहून तरुण डॉक्टरची आत्महत्या

Suicide: सुसाईड नोट लिहून तरुण डॉक्टरची आत्महत्या

Karjat Young Doctor Suicide

कर्जत | Suicide: कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील डॉ. विश्वास कवळे वय २८ यांनी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान राहत्या घरी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

डॉ. विश्वास कवळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे आढळून आले. डॉ. विश्वास कवळे यांनी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर मिरजगाव येथील आपल्या राहत्या घरात वैद्यकीय सेवा सुरु केली होती. त्यांच्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. या तरुण डॉक्टरने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. आपण आपल्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत करत असल्याचे त्यांनी नोट मध्ये लिहून ठेवले आहे.

Web Title: Karjat Young Doctor Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here