अहिल्यानगर: मुलीस पळविले; आरोपीस अटक
Breaking News | Ahilyanagar: अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली.
कोपरगाव : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात आरोपीस मदत करणाऱ्या त्याच्या आई, बहीण व मेहुण्यास पोलिसांनी सहआरोपी केली आहे. त्यांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनदेखील आरोपीस मदत केली होती. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके करीत होते.
त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी मुलगी पोलिसांना सापडली. तिच्या जबाबावरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८७, ६४ (२) (आय), (एम), ६५ (१), ४६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२, १७ प्रमाणे वाढ केली आहे. शहरातील एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस दि. २१ ऑक्टोबर रोजी घराजवळून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी आरोपी वैभव संजय लोखंडे (वय २०, रा. खडकी) याने मुलगी अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेतला.
Web Title: Kidnapped Accused arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study