Home अहमदनगर संगमनेरातून अपहृत मुलीची दोन वर्षांनंतर सुटका

संगमनेरातून अपहृत मुलीची दोन वर्षांनंतर सुटका

Breaking News | Ahmednagar: संगमनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून बोल्हेगाव येथून सुटका.

Kidnapped girl released from Sangamner

नगर : संगमनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून बोल्हेगाव येथून सुटका करण्यात आली.

 मुलीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सौरभ अरविंद ठाकूर (वय २५, रा. गुजरात; मूळ रा. सागर, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संगमनेर परिसरातून आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. या गुन्ह्याचा तपास १९ ऑगस्ट २०२४ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे तपास करीत असताना आरोपी पीडित मुलीसह बोल्हेगाव (नगर) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह जाऊन अपहृत मुलगी, आरोपी व त्यांचा एक वर्षांचा मुलगा यांना ताब्यात घेतले व संगमनेर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल समीर सय्यद, अर्चना काळे, अनिता पवार, छाया रांधवन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Kidnapped girl released from Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here