अहमदनगर: अल्पवयीन मुलीला पळविले, पोलिसांनी चोवीस तासांत शोधले
Ahmednagar News: पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा (Kidnapped) २४ तासांत शोध लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश.
अहमदनगर: शहरातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासांत शोध लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. त्या मुलीला ताब्यात घेऊन आई-वडिलांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.
याबाबत मुलीच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अल्पवयीन मुलीला बुधवारी सकाळी ११ वाजता अज्ञात इसमाने पळवून नेले होते. एमआयडीसी पोलिस अल्पवयीन मुलीचा शोध घेत असताना सदर मुलगी छत्रपती संभाजीनगर रोड परिसरात आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तत्काळ पथक रवाना केले. पथकाने अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. मुलीला पोलिस ठाण्यात हजर करून तिला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक पोपट टिक्कल, दीपक पाठक, राजेंद्र गायकवाड, विष्णू भागवत, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, सोनिया पारधे आदींच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोपट टिक्कल करत आहेत.
Web Title: Kidnapped minor girl, police found within 24 hours
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App