Home अहमदनगर अहमदनगर: ११ वीच्या विद्यार्थिनीचे घरातून अपहरण, तरुणावर गुन्हा

अहमदनगर: ११ वीच्या विद्यार्थिनीचे घरातून अपहरण, तरुणावर गुन्हा

Ahmednagar News: नगर येथे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे राहुरी येथील तिच्या राहत्या घरातून अपहरण (Kidnapping).

Kidnapping of 11th class student from home

राहुरी: नगर येथे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे राहुरी येथील तिच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यातील एका गावात कुटुंबासह राहते. ती नगर येथील एका कॉलेजमध्ये ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. २४ फेब्रुवारीला सकाळी मुलीचे आई वडील घराबाहेर गेले होते. त्यावेळी ती घरी एकटीच होती. दुपारी आई वडील घरी आले असता मुलगी घरातून बेपत्ता होती. तिचा आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे

Web Title: Kidnapping of 11th class student from home

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here