अहमदनगर: ५० हजाराच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण
Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलाचे (वय १५) ५० हजाराच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना.
अहमदनगर: आईला मारहाण करीत तिच्या अल्पवयीन मुलाचे (वय १५) ५० हजाराच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना शुक्रवारी (दि. १६) रात्री केडगाव उपनगरात घडली. याप्रकरणी आईने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत सात जणांविरोधात फिर्याद दिली आहे.
अजिनाथ काळे, जावेद अजिनाथ काळे, जानीदेवोल अजिनाथ काळे, जानेमन अजिनाथ काळे, नजऱ्या अजिनाथ काळे, आकेश अजिनाथ काळे, अली भोसले (सर्व रा. केडगाव) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री अजिनाथ
काळे, जावेद काळे, जानीदेवोल काळे यांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून त्यांना मारहाण करून घराबाहेर काढले. जानेमन काळे, नजऱ्या काळे, आकेश काळे, अली भोसले यांनीही मारहाण करून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलाला बळजबरीने दुचाकीवर बसवून घेऊन गेले. ‘तुला जर तुझा मुलगा सुखरूप पाहिजे असेल तर ५० हजार रूपये दे, तेव्हा तुझ्या मुलाला सोडू नाही तर त्याचा मुडदा पाडू’, अशी धमकी देऊन खंडणीसाठी अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहा. पोलीस निरीक्षक महेश जानकर अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Kidnapping of a minor for ransom of 50 thousand
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study