Home क्राईम संगमनेरात अल्पवयीन मुलीचे अपहरण, एकावर गुन्हा

संगमनेरात अल्पवयीन मुलीचे अपहरण, एकावर गुन्हा

Sangamner Crime:  अल्पवयीन मुलीचे अपहरण ( Kidnapping) झाल्याची घटना, युवकास पकडण्यात आले असून त्याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल.

Kidnapping of a minor girl in Sangamner

संगमनेर: अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना रविवारी दुपारी शहरात घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरण करणार्‍या युवकास पकडण्यात आले असून त्याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका उपनगरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीचे काल दुपारी अपहरण करण्यात आले होते. हा प्रकार लव जिहादचा असल्याच्या संशयावरून जागृत नागरिकांनी या मुलीला व तिला पळून येणार्‍या युवकास पकडून पोलीस ठाण्यात आणले होते. या मुलीला पळवून नेणार्‍या तरुणाने मुलीच्या वडिलांच्या इंस्टाग्रामवर मेसेज करून तिला बस स्थानकावर बोलावून तेथून तिचे अपहरण केले होते. अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असलेला अमन मोमीन हा गंगामाई घाटावर आढळून आला. या मुलीची आरोपीशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातूनच पीडित मुलगी आणि आरोपी यांचा संपर्क सुरू होता.

रविवारी सायंकाळी चार वाजता काही नागरिकांना ही अल्पवयीन मुलगी एका तरुणासोबत गंगामाई घाटावर एका आडोशाला आढळून आली. त्यामुळे संशय निर्माण झाल्याने काही नागरिकांनी तिची विचारपूस केले असता ही मुलगी अल्पवयीन असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी दोघांनाही संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अमन सलिम मोमीन (वय 18, रा. मोमीनपुरा ता. संगमनेर) याचेविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम अपहरणासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Kidnapping of a minor girl in Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here