Home अहमदनगर अहमदनगर: गोळी झाडत मित्राचा खून, मृतदेह नदीकाठी फेकला

अहमदनगर: गोळी झाडत मित्राचा खून, मृतदेह नदीकाठी फेकला

Breaking News | Ahmednagar: गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून, खुनाचा उलगडा : मृतदेह कारमधून नेला सांगलीला, मृतदेह वारणा नदीकाठी नेऊन फेकला, मुख्य आरोपी फरार

Killed a friend by shooting, body was thrown by the river

नेवासा : नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे येथील एका तरुणाचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठी शनिवारी (दि. १४) आढळून आला. भाऊसाहेब रामदास पवार (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली. गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

रवींद्र किसन माळी (रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुख्य आरोपी गोरख अशोक माळी हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे. याबाबत अण्णा वसंत पवार यांनी फिर्याद दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  शनिवारी सायंकाळी हे तिघे हॉटेलचा माल आणण्यासाठी इटिंगा कारने (एमएच ४८, एडब्लू ३८१५) नगरला आले होते. ते शेंडीबायपासने जात असताना नागापूर येथील दूध डेअरी चौकात थांबले. त्यावेळी यातील आरोपी गोरख माळी याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून भाऊसाहेब पवार याचा खून केला. घटना घडल्यापासून हे तिघेही फरार होते. दरम्यान, सांगली जिल्ह्यात एक मृतदेह बेवारस मिळून आला. मयताच्या अंगावर असलेल्या टी शर्टवर मोरया चिंचोरे असे लिहिले होते. त्यामुळे कुरळप पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क केला. हा मृतदेह मोरया चिंचोरे येथील भाऊसाहेब पवार याचा असल्याचे समोर आले. त्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आरोपींचा शोध घेत असताना रवींद्र किसन माळी हा गावात मिळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी गोरख माळी हा घटना घडल्यापासून फरार असून, त्यानेच मृतदेह वारणा नदीकाठी नेऊन फेकला. तो गावठी कट्टा व कार घेऊन फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी केली.

आरोपी म्हणतो कट्ट्यातून अचानक गोळी सुटली दरम्यान, अटक केलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने गावठी कट्टा दाखवीत असताना अचानक गोळी सुटली. ही गोळी पवार याच्या डोक्याला लागली. त्यात त्याचा मृत्यू झाला. कारवाईच्या भीतीने पुरावा नष्ट करण्यासाठी गोरख माळी हा मृतदेह घेऊन गेला, अशी कबुली आरोपीने दिली आहे. मात्र खुनामागे नेमके काय कारण हे दुसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतरच समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Killed a friend by shooting, body was thrown by the river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here