Home संगमनेर संगमनेर: विवाहितेचा खून करून रस्त्याच्या कडेला फेकला मृतदेह,  अपघाताचा बनाव

संगमनेर: विवाहितेचा खून करून रस्त्याच्या कडेला फेकला मृतदेह,  अपघाताचा बनाव

Breaking News | Sangamner Crime: महिलेच्या गावातील एका तरुणाने विवाहितेचा खून, तपास केला असता महिलेचा खून झाल्याचे समोर.

killed and threw her body on the side of the road

संगमनेर : नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर तालुक्यातील कासारा- दुमाला शिवारात शुक्रवारी (दि.१४) रात्री बाराच्या सुमारास विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यू आणि त्यानंतर अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल होता. परंतु, पोलिसांनी तपास केला असता महिलेचा खून झाल्याचे समोर आले. महिलेच्या गावातील एका तरुणाने तिचा खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या बाबत अधीक माहिती दिली. रंजना भिकाजी खेमनर (वय ३५, रा. अंभोरे) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या खून प्रकरणी त्यांच्याच गावातील बाळासाहेब बिरू हळनर याला पोलिसांनी अटक केली आहे. रंजना खेमनर हिचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला, असा प्रकार वाटत असल्याने अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल होता.

रंजना खेमनर यांना चंदनापुरी घाटात नेऊन त्यांचा खून केल्याची कबुली हळनर याने पोलिसांना दिली. खेमनर आणि त्याचे संबंध होते. त्यामुळे त्या त्याच्याकडे वारंवार आर्थिक मागणी करायच्या. त्यावरून त्याने खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

अपघाताचा बनाव हळनर याने रंजना खेमनर यांना दुचाकीवर बसवून घाटात नेले, तेथे त्यांचा खून केला. त्यानंतर तो पुन्हा त्याच्या घरी आला. त्याने घरून चारचाकी वाहन नेले. त्यात खेमनर यांचा मृतदेह टाकला त्यानंतर कासारा-दुमाला शिवारात आणून टाकला, मृतदेहावरुन चारचाकी वाहन घातले. चपला नव्हत्या अपघातस्थळी मृतदेहाजवळ कुठेही खेमनर यांच्या चपला आणि त्यांचा मोबाइल आढळून आला नाही. रंजना खेमनर आणि त्यांच्या गावातील बाळासाहेब हळनर यांच्यात मोबाइलद्वारे संभाषण झाले होते.

Web Title: killed and threw her body on the side of the road

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here