खळबळजनक! प्रेयसीची हत्या, गळा चिरून मृतदेह नदीत फेकला
Breaking News |Palghar Crime: प्रॉपर्टीसाठी प्रियकराने प्रेयसीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना.
पालघर: पालघरमध्ये प्रॉपर्टीसाठी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसी लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर अशी बळजबरी करत होती. त्यामुळे वैतागून प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. पालघरमध्ये प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेलं एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात पालघर पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघड करण्यात आली आहे.
सोलापूरमधील सुनील यादव याचं एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र, ही महिला सुनीलला वारंवार लग्न करून प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याची जबरदस्ती करत होती. अखेर सुनील या प्रकारामुळे प्रचंड वैतागला अन् त्याने प्रेयसीला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने मित्राची मदत घेतली आणि योजना आखली.
लोणावळ्याला जाऊ असं सांगत या दोन्ही आरोपींनी मृत तरूणीला गाडीत बसवलं अन् घटनास्थळी आणलं. आरोपी सुनील यादव याने आपला साथीदार महेश बडगुजर याच्या मदतीने प्रेयसीची निर्घृण हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचं मुंडक शरीरापासून वेगळ केलं. तो मृतदेह वैतरणा नदीत फेकून दिला होता.
Web Title: killed his girlfriend, cut her throat and threw her body in the river
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study