Home अहमदनगर अहमदनगर: नराधम महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर करत राहिला अत्याचार

अहमदनगर: नराधम महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर करत राहिला अत्याचार

Breaking News | Ahmednagar: महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर अत्याचार झाल्याची माहिती समोर.

killer kept abusing the college girl for a year

कोपरगाव: अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  अत्याचारासंदर्भात घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर अत्याचार झाल्याची माहिती समोर आलीये. अभिषेक वसंत कनगरे या आरोपीस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी असलेल्या अभिषेक वसंत कनगरे याने येवला शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या १९ वर्षीय युवतीवर एक वर्ष शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी सदर तरुणीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरुणी ही मूळ श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असून ती येवला तालुक्यात शिक्षण घेत आहे. तिची अभिषेक वसंत कनगरे याच्याशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्यातून त्याचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. मात्र त्यात नंतर वितष्ट आले होते. तरीही त्याने सदर तरुणीवर शारीरिक अत्याचार केले. अशा आशयाची फिर्याद तरूणीने कोपरगाव पोलिसांत गुरुवारी दाखल केली. यावरून अभिषेक कनगरे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मयूर भामरे हे करीत आहेत.

Web Title: killer kept abusing the college girl for a year

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here