ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन
Kirtankar H.B.P. Baba Maharaj Satarkar passed away.
मुंबई: प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार (दि. २७ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ०५ फेब्रुवारी १९३६ रोजी नामवंत गोरे सातारकर घराण्यात साताऱ्यात झाला. त्याकाळी त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतले. वास्तविक निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव होते. मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळाले ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिले. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह.भ.प.भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे.
Web Title: Kirtankar H.B.P. Baba Maharaj Satarkar passed away
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App