Home Accident News टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Kopargaon bramhangav tempo two-wheeler Accident 

कोपरगाव | Kopargaon: शुक्रवारी सकाळी ब्रम्हानगाव शिवारात महाजन वस्तीजवळ अज्ञात टेम्पोने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

ब्रम्हानगाव टाकळी रोडने दुचाकीवरून (गाडी. एम.एच.१५. बी.पी. ६८९३) कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला अज्ञात टेम्पोने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडला. कोपरगाव तालुक्यातील ब्रम्हानगाव शिवारात महाजन वस्तीजवळ हा अपघात झाला.

भीमा येसू खुरसने रा. देवी वस्ती धरणगाव ता. कोपरगाव असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मंगेश बळीराम जिरे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  अज्ञात टेम्पो चालक हा फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करीत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Kopargaon bramhangav tempo two-wheeler Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here