Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्हा हादरला: भर बाजारात युवकाचा दगडाने ठेचून खून

अहमदनगर जिल्हा हादरला: भर बाजारात युवकाचा दगडाने ठेचून खून

Kopargaon Murder youth was stoned to death in Bhar Bazaar

Ahmednagar News Live | Kopargaon Murder | कोपरगाव: शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळात सोमवारच्या बाजारात सात ते आठ जणांनी रॉड, गज व दगडाने ठेचून युवकाचा खून केल्याची घटना घडली आहे. भर बाजारात झालेल्या तरुणाच्या खुनाने कोपरगावसह जिल्हा हादरला आहे.  

राजा भोसले असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  तो शिंगणापूर येथील रहिवासी आहे. मयत राजा भोसले याला शहरातील संत जनार्धन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मृत  घोषित केले आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास करीत आहे.

Web Title: Kopargaon Murder youth was stoned to death in Bhar Bazaar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here