Home कोपरगाव Kopargaon: दुर्दैवी घटना, नदीत बुडून एकाचा मृत्यू

Kopargaon: दुर्दैवी घटना, नदीत बुडून एकाचा मृत्यू

Kopargaon Taluka one death in river

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव शहरातील दत्तात्रय किसन पंडोरे वय ५२ यांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तात्रय पंडोरे हे सोमवारी पहाटे फिरायाला गेले होते. सकाळी आठ वाजेनंतरही ते घरी परतले नाही. घरच्यांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला मात्र ते कोठेही आढळून आले नाही.

दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दत्तात्रय पंडोरे यांचा मृतदेह कोपरगाव तालुक्यातील सडे शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात आढळून आला. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविचेदन करण्यात आले. त्यांचा मुलगा सागर पंडोरे यांच्या खबरीवरून कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Kopargaon Taluka one death in the river 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here