Home Ahmednagar Live News टेलरच्या दुकानाला भीषण आग, तीन लाखांचे नुकसान

टेलरच्या दुकानाला भीषण आग, तीन लाखांचे नुकसान

Kopargaon Terrible fire at Taylor's shop

Ahmednagar News Live | Koprgaon | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे टेलरच्या दुकानाला भीषण आग (Fire) लागून या आगीत तब्बल तीन लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास मास्टर टेलर या दुकानाला आग लागली यामध्ये दुकानांमधील असलेल्या मशीन, विक्रीसाठी आलेले कापड व शिवलेले ड्रेस जळून खाक झाले.

या आगीत टेलर युसुफ हासम शेख त्यांचे तब्बल तीन लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव-संगमनेर महामार्गाच्या बाजूला असलेल्या शनी मंदिर परिसरातील शेख यांच्या टेलरिंग दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. पहाटे व्यायामासाठी जात असलेल्या स्थानिक तरुणांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी तात्काळ मोबाईलद्वारे आगीबाबत माहिती दिली.  आग विझविण्यासाठी शंकरराव काळे कारखान्यातील अग्निशमक पथक आले. शर्तीचे प्रयत्न करून दुकानाला लागलेली आग विझवण्यात आल्यामुळे शेजारील दुकानांचे मोठे नुकसान टळले.

Web Title: Kopargaon Terrible fire at Taylor’s shop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here