Home अकोले क्षितीज फौंडेशन अमृतनगर नवलेवाडी अकोले आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

क्षितीज फौंडेशन अमृतनगर नवलेवाडी अकोले आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

Kshitij Foundation Amritnagar Navlewadi Akole Blood Camp

अकोले | Akole: क्षितीज फौंडेशन अमृतनगर नवलेवाडी अकोले आयोजित रक्तदान शिबीर शुक्रवारी गणपती मंदिर नवलेवाडी येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपन्न झाले.

या शिबीरास अकोले तालुक्यातून उत्स्फुर्द असा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २१ ते ६१ वयोगटातील व्यक्तींनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास अर्पण रक्तपेढी तर्फे एक वर्षाकरिता प्रमाणपत्र देण्यात आले.

या शिबीरात सर्वोदय विद्या मंदिर राजूर येथील प्राध्यापक विनोद तारू यांनी आजपर्यंत २६ वेळा रक्तदान केल्याने त्यांचा अर्पण रक्तपेढी तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मुलानी या परिवारातील तीन व्यक्तींनी रक्तदान करून समाजात आदर्श निर्माण करून दिला आहे.

Prof Vinod Taru

यावेळी अर्पण रक्तपेढी तर्फे डॉ. नितीन जैन व वैभव राणे व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी क्षितीज फौंडेशनची सेक्रेटरी सौ. वैशाली ज्ञानेश्वर वैरागर उपस्थित होत्या. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी निखील वैरागर, सागर पवार, जंगारे सर व परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Kshitij Foundation Amritnagar Navlewadi Akole Blood Camp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here