परप्रांतीय महिलेच्या माध्यमांतून कुंटणखाना, पोलिसांचा छापा, पाच महिलांची सुटका
Breaking News | Beed Crime: कुंटनखानावर पैसे घेतांना पोलिसांनी छापा टाकुन आंटीसह सह दोन ग्राहक आढळून आले या ठिकाणी आसलेल्या ५ परप्रांतीय महिलेस आठ महिलेची सुटका.
बीड : बीड शहरातील शाहुनगर अंबिका चौकात कुंटनखाना चालत आसलेल्या गुप्त माहिती द्वारे माजलगाव पोलिस विभागीय कार्यालयाचे साहा. पोलिस अधिक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांनी नेमलेल्या विशेष पथकाद्वारे दि. ३० रोजी सायं ५वाजण्याच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवुन नियोजनबध्द कुंटणखाना चालवणारी सोजरबाई होनाजी खंडागळे हिस पैसे घेतांना पोलिसांनी छापा टाकुन आंटीसह सह दोन ग्राहक आढळून आले या ठिकाणी आसलेल्या ५ परप्रांतीय महिलेस आठ महिलेची सुटका करण्यात आली व सोजरबाई खंडागळेस आटक करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड शहरातील शाहुनगर भागातील अंबिका चौकामध्ये येथे कुंटणखाना चालु असल्याच्या गुप्त खबरी वरून साहा. पोलिस अधिक्षक डॉ.बी. धिरजकुमार यांनी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आणि या विशेष पथकामार्फत दि.३० रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शाहूनगर अंबिका चौक येथे छापा मारला असता सोजरबाइ होनाजी खंडागळे हिच्या घरामध्ये अतिशय योजनाबद्धरीत्या कुंटणखाना चालू असलेला आढळून आला. यासाठी एक बनावट ग्राहक तयार करण्यात आलं होतं आणि बनावट बनावट ग्राहकाकडून यातील सोजरबाई होनाजी खंडागळे हिने कुंटणखाना चालवण्यासाठी पैसे स्वीकारताच यातील पोलीस पथकाने छापा मारला आणि आंटी सह दोन ग्राहकांना रंगेहात सर्वांना पकडलं. सदरील छापा मारून एकूण आठ महिलांची सुटका करण्यात आली आणि या आठ पैकी चार महिला या पश्चिम बंगाल राज्यातील असून एक महिला झारखंडची आहे तसेच एक महिला बीड तसेच एक महिला ठाणे तशीच एक महिला मुंबई येथून आणण्यात आल्या होत्या. यातील सोजरबाई होनाजी खंडागळे हिला अटक करण्यात आलेली आहे. आणि या कुंटणखाना चालवणारी इतर टोळी ही आसु शकते त्या दृष्टीने तपास करणार आसल्याचे पोलीस सुत्रांनी कळवले आहे.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
या धाडीत एक पिशवी भरून कंडोमची पाकिटे जप्त करण्यात आली आहे आणि तेथे यातून मिळालेली २५हाजार६०० रुपये जप्त करण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पिडितांची त्यांची सुटका केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Kuntankhana, police raid, rescue of five women through the media of a migrant woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study