संगमनेरात पुन्हा एकदा एटीएम फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास
Sangamner News: एटीएम मशीन जाळून टाकत एटीएममध्ये असणारे ४ लाख ८६ हजार ६०० रूपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील एटीएम फोडण्यात आले आहे. तळेगावात एटीएम फोडत चोरट्यांनी लांबवले पावणे पाच लाखांची रक्कम संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे असणाऱ्या इंडियन ओव्हरसेज बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास फोडत तसेच एटीएम मध्ये असणारा सीसीटीव्ही कॅमेरा व एसी तसेच एटीएम मशीन जाळून टाकत एटीएममध्ये असणारे ४ लाख ८६ हजार ६०० रूपये अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याची घटना घडली आहे.
सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला तर घटनास्थळी तपासकामी अहमदनगर येथील श्वान पथक व ठसा तज्ञ टीमला पाचारण करण्यात आले होते. आत्तापर्यंत इंडियन ओव्हरसेज बँकेचे एटीएम तीनदा फोडण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. सदर एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच बघायला मिळते आहे. यावेळी संगमनेर पोलीस उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे,पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, पोलिस नाईक राजेंद्र पालवे, पोलीस नाईक ओंकार शेंगाळ, यांसह अनेक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
सदर घटनेचा अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे करत आहेत.एटीएम फोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत मात्र एटीएम फोडीच्या घटनेतील गुन्हेगार शोधण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. एटीएम चोरट्यांच्या तपास लावण्याचा पोलिसांसमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
Web Title: Lakhs of rupees were looted after breaking the ATM in Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App