Home अकोले अकोलेत मोटारसायकल चोरीचे मोठे रॅकेट उघड, दोन जण अटकेत

अकोलेत मोटारसायकल चोरीचे मोठे रॅकेट उघड, दोन जण अटकेत

Large racket of motorcycle theft uncovered in Akole

Ahmednagar news Live | Akole Theft | अकोले:  अकोले तालुक्यातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलच्या गुन्ह्याचा तपास करत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे तपास पथकाला चोरीचे मोठे रॅकेट पकडण्यात यश आले आहे.  दोन आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून १२ मोटारसायकल जवळपास १२ लाख किमतीच्या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.

अकोले पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 06/2022 भा.द.वि.कलम 379 प्रमाणे दि. 04/01/2022 रोजी दाखल करण्यात आला होता.यामध्ये  फिर्यादीने त्यांची बजाज कंपनीची लाल काळ्या रंगाची डिस्कव्हर MH-17-AK-2884 अशी मोटार सायकल कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकास गोपणीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी  प्रविण एकनाथ गांडाळ, वय 21 वर्षे,रा. सावरचोळ, मेंगाळवाडी, ता. संगमनेर याने केला आहे  त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे कडे विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार 2) शरद रमेश गांडाळ रा. सावरचोळ, मेंगाळवाडी, ता. संगमनेर याचे मार्फतीने सदरच्या मोटार सायकल विक्री केल्याचे सांगण्यात आले. त्यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांचे इतर दोन साथीदार यांचे सोबत आणखीन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगण्यात आले असून ते दोन साथीदार फरार आहेत. आरोपी यांचेकडुन १२ मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. ५ लाख रूपये किमतीच्या १२  मोटार सायकल गुन्ह्याचे तपासात हस्तगत करण्यात आल्या आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत व वारंवार मोटार सायकल चोरणारे आरोपी आहेत. त्यांचे विरुद्ध इतर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. या आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे,श्रीरामपुर,  उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने संगमनेर उपविभाग, संगमनेर,  सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे अकोले पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शना खाली पोहेकॉ  हरिदास लांडे, अकोले पोलीस स्टेशन,पो.कॉ गणेश शिंदे अकोले पोलीस स्टेशन,पोना आण्णासाहेब दातीर, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, पोकॉ सुभाष बोडखे, पोकॉ प्रमोद गाडेकर, घारगांव पोलीस स्टेशन, पोकॉ अमृत आढाव,  संगमनेर शहर पोलीस स्टेशन,  पोना फुरकान शेख, मोबाईल सेल, अपर पोलीस अधिक्षक कार्यालय, श्रीरामपुर यांनी संयुक्तपणे केली आहे. अधिक तपास पोहेकॉ हरिदास लांडे हे करत आहे.

Web Title: Large racket of motorcycle theft uncovered in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here