दिवंगत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार अन तक्रारीस…..
Breaking News | Pune Crime News : शॉपींगच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये नेण्यात आलं आणि तिचे शरीर शोषण केलं.
पुणे: शहरातील हडपसर पोलीस ठाण्यात एका बलात्कार पीडितेला तक्रार नोंदवण्यासाठी तब्बल 21 दिवसांची वाट पाहावी लागली आहे. यावरुनच आता पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले यांनी घेतलेल्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानंतरही गंधाले यांनी कोणतंही कारवाईचं पाऊल उचललं नाही. उलट पीडितेला आणि तिच्या आईला रात्री 11 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं होतं. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक न करता नराधमाला न्यायालयातून अंतिम जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित एका दिवंगत पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे. पोलीस प्रशासन तिला कोणतीही मदत करताना दिसत नाही. पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार करत 16 लाखांची फसवणूक केली, असा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या आईने पुणे टाइम्स मिरर माध्यमाशी बोलताना ही घटना सांगितली. त्या म्हणाल्या की, आरोपीचा माझ्या मुलीसोबत विवाह होणार होता. तर दुसरी बाब म्हणजे अशी की, माझ्या हयात नसलेल्या पतीने इतकी वर्षे पोलिसात नोकरी करुनही गरजेच्या वेळी आम्हाला पोलीस प्रशासन धावून आलं नाही.
दरम्यान, पीडित तरुणी ही पुण्यातील मांजरी येथील रहिवासी आहे. तिचं ब्युटी पार्लरचं शॉप आहे. तिने फिर्यादीत म्हटलं की, डिसेंबर 2020 मध्ये ती लोणी काळभोर येथील एका जिममध्ये नोकरी करत होती. आरोपीचे नाव श्यामनाथ गंभीरे असून तो नेमका त्याच जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होता. त्यानंतर पीडितेनं एक महिना काम केलं आणि तिनं ती जिम सोडली.
जून 2021 या वर्षी पीडितेच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी पीडितेच्या आईला पोषक आहार देण्याचा सल्ला दिला. यानंतर पीडितेने आरोपी गंभीरेकडे गेली आणि तिच्या आईसाठी डाएट प्लॅन देण्याची विनंती करण्यात आली. यानिमित्ताने आता गंभीरे पीडितेच्या घरी येऊ लागला होता. यामुळे त्यांच्या संबंधात अधिक वाढ होऊ लागली. त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्या दोघांचं लग्नही ठरलं होतं.
दरम्यान, आरोपीने कुटुंबाची मोठी फसवणूक केल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितलं की, पीडितेच्या वडिलांचं मांजरीमध्ये एक घर होतं. त्यांना नवीन घर घेण्यासाठी जूनं घर विकायचं होतं. अशावेळी गंभीरेने घर विकण्यासाठी मदतही केली. त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं की, तो एक चांगला बांधकाम व्यवसायाचं काम करतो. त्याने घर बांधण्यासाठी एका चांगली जागा पाहिली आहे. त्याने एका शेअर मार्केटमध्ये चांगले पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिलं.
पीडितेच्या नावावर कर्ज काढून दुचाकी घेतली
पीडितेनं आरोप केला की, एप्रिल 2022 ते जुलै 2024 पर्यंत आरोपीने तिच्या कुटुंबाकडून 16 लाख रुपयांहून अधिक रक्कम घेतली. त्याने पीडितेच्या नावावर कर्ज काढून दुचाकी विकत घेतली. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी त्यांचा साखरपुडा झाला. 14 डिसेंबर 2023 रोजी त्यांचा विवाह होणार होता. दरम्यान, पीडितेनं आरोप केला की, सप्टेंबर 2023 मध्ये गंभीरेनं तिला शॉपींगच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये नेण्यात आलं आणि तिचे शरीर शोषण केलं. ही बाब कुटुंबियांना कळताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर पीडितेनं आरोपीकडे आपल्या पैशांची मागणी केली होती. आरोपी गंभीरेनं आणि त्याच्या कुटुंबियांनी तिचा नंबर ब्लॉक केला.
त्यानंतर पीडितेनं सांगितलं की, वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांना एका रुग्णालयात दाखल करता आलं नाही. अशातच त्यांचं निधन झालं. त्यांनी आपल्या स्वकष्टातून कमावलेलं घर विकावं लागलं. गंभीरेनं आमचे पैसे घेतले आणि आमचीच फसवणूक केली आहे, असे पीडितेनं म्हटलंय. दरम्यान, गंभीरे हा शहर सोडून गेला असून त्याने आपला मोबाईल फोन बंद ठेवल्याची माहिती पीडितेनं दिली आहे.
आम्ही त्याच्या आई वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आम्हाला हकलून दिलं. त्यांनीही आम्हाला ब्लॉक केलं. नोव्हेंबरमध्ये माझी आई आणि मावशी त्याच्या धाराशीव येथील घरी गेली. त्यांनी आम्हाला हकलवलं असे पीडितेनं सांगितलं. यानंतर, मी हडपसर पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली असता, माझी तक्रार कोणीच दाखल करुन घेत नव्हतं. माझे वडील हे निवृत्त कर्मचारी होते, असे सांगूनही त्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. तब्बल 21 दिवसानंतर तक्रार दाखल केली. त्याआधी मला आणि आईला रात्री 11 वाजेपर्यंत बसवलं होतं.
महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
आरोपीचा आणि पीडितेचा साखरपुडा झाला होता
आरोपीचं आणि माझा साखरपुडा झाल्याचं अनेकदा सांगितलं तरी पोलीस अधिकारी अशोक गंधाले मान्य करायला तयार नव्हते. अशावेळी त्यांनी साखरपुड्यात उपस्थित असणाऱ्यांना साक्षीदार म्हणून बोलवले. पण माझी आई त्यापैकी एक मोठी साक्षीदार आहे, असे पीडितेनं तक्रारीत नमूद केलं. त्यानंतर पीडितेनं लिहिलं की, मला वाटलं पीडित तरुणींना महिलांना महिला पोलीस अधीकाऱ्यांकडे तक्रारीसाठी जावं लागतं. मात्र, माझं दुर्देव असं की, मला एका पुरुषाला हे सर्व प्रकरण सांगावं लागत आहे.
दरम्यान, काही दिवसांतच आरोपीला जामीनही मंजूर झाला. त्यानंतर आरोपीने एका फेक अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. गंधाले यांना आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही गंधाले यांनी काहीही केलं नाही. अशातच आता गंधाले यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
Breaking News: Late police officer’s daughter raped