अकोले: दारूबंदीची मागणी करणाऱ्या महिलेस मारहाण
अकोले: ग्रामपंचायतीने गावात दारूबंदीचा ठराव करून पोलिसांना निवेदन दिले म्हणून एका महिलेला धक्काबुकी करून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ इंदोरी ग्रामस्थांनी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना निवेदन देत संबंधित इसमावर कारवाई करून गावातील अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी केली आहे.
अकोले तालुक्यातील इंदोरी गावात सन १९९८ रोजी गावात दारूबंदी करण्यात आली होती. सरकारमान्य दारूचे दुकान बंद करण्यात आले. सद्यस्थितीत इंदोरी गावात अवैधरीत्या दारू विक्री केली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंदोरी ग्रामपंचायतीने गावातील अवैध दारू विक्री बंद करा असा ठराव करून तो अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आला. तत्पूर्वी इंदोरी गावातील महिलांनी सरपंचाना एक निवेदन यासंदर्भात दिले होते. याचा राग मनात ठेऊन आरोपी राजेंद्र भागवत नवले याने फिर्यादी सीमा सीमा सुरेश हासे हिस सोमवारी सकाळी ९:३० वाजता तिच्या राहत्या घरासमोर धक्काबुक्की करीत मारहाण केली. यानंतर सीमा हिने अकोले पोलिसांत तक्रार दिली असून यावरून अकोले पोलिसांनी आरोपी राजेंद्र नवले याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून इंदोरी ग्रामस्थांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इशू सिंधू हे अकोल्यात आले असता त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.
Website Title: Latest News Akole darubandi Nivedan