Home अकोले अकोले: आजारपणाला कंटाळून रुंभोडीत युवकाची आत्महात्या

अकोले: आजारपणाला कंटाळून रुंभोडीत युवकाची आत्महात्या

अकोले: तालुक्यातील रुंभोडी येथील एका तरुणाने आजारपणाला कंटाळून आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महात्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. हौशीराम गंगाधर मधे (वय २५,रूंभोडी) असे आत्महात्या  केलेल्या युवकाचे नाव आहे.

हौशीराम हा अनेक दिवसांपासून आजारी होता. औषधोपचार सुरू होते. मात्र दीर्घ काळाच्या आजारपणामूळे त्याला नैराश्य आले. त्यातूनच त्याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महात्या केली.

याबाबत मृत हौशीराम याचा भाऊ पंढरी मधे याने दिलेल्या खबरीवरून अकोले पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे कॉन्स्टेबल वाघ हे करत आहेत.

Website Title: Latest News Akole: The Story Of Suicide Of The Underprivileged Youth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here