Home संगमनेर संगमनेरमधील दाम्पत्यावर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

संगमनेरमधील दाम्पत्यावर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

संगमनेर: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना विनाप्रवास करून भिंगार येथे राहत असलेल्या संगमनेरमधील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज पांडुरंग चव्हाण व अर्चना पंकज चव्हाण अशी या दाम्पत्याची नावे आहेत. हे दोघेही गुपचूप राहत असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हे दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसोबत खळेवाडीतील देवनगरी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गुपचूप रहात असल्याची माहिती गावात गस्त घालताना भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. पंकज व अर्चना हे दोघेही आपल्या सहा व तीन वर्षांच्या मुलांसह संगमनेर येथून कारमधून प्रवास करुन विनापरवाना येऊन येथे गुपचूप रहात असल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच त्यांनी रुग्णालयात कुटुंबाची तपासणी केली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Website Title: Latest News couple in Sangamner for violating the order

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here