Home संगमनेर संगमनेरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि चाहत्यांचा राडा, पोलिसांची दमछाक

संगमनेरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि चाहत्यांचा राडा, पोलिसांची दमछाक

Sangamner: Lavani performance by Lavani dancer Gautami Patil at Talegaon: लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम.

Lavani performance by Lavani dancer Gautami Patil at Talegaon

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे बिरोबा यात्रेनिमीत्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या‌ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी अनुभवायाला मिळाली. यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक बाऊंसर एक डझन महिला बाऊंसर तसेच तीस ते चाळीस पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गौतमीची लावणी सुरू होताच अनेक तरूणांनी बँरेकेटस हटवत आत घुसण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. गर्दीवर नियंत्रण मिळवताना बाउंसरसह पोलिसांची मोठी दमछाक झाली होती.

Web Title: Lavani performance by Lavani dancer Gautami Patil at Talegaon

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here