संगमनेर: जुन्या भांडणाच्या कारणातून वकील व त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ला
Sangamner Crime: जुन्या भांडणाच्या कारणातून संगमनेरमधीत प्रसिद्ध वकील शरीफखान रशीदखान पठाण आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना.
संगमनेर: जुन्या भांडणाच्या कारणातून संगमनेरमधीत प्रसिद्ध वकील शरीफखान रशीदखान पठाण आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रात्री शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादिक रज्जाक शेख, आयान सादिक शेख, इमरान बशीर शेख, जुनेद सादिक शेख, आयाज रज्जाक शेख, कदीर नुरमुहम्मद शेख व आशफाक इब्राहिम पटेल अशी हल्लेखोर आरोपींची नावे आहेत.
पठाण यांनी आरोपी सादिक रज्जाक शेख याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केलेली चोरीची तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपींकडून वकिलावर दबाव आणला जात होता. याच कारणातून शुक्रवारी सकाळी आरोपींनी अॅड. पठाण व त्यांच्या नातेवाईकांशी वाद घालत शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पठाण यांनी आरोपीविरोधात पुन्हा तक्रार दाखल केली होती.
या रागातून संध्याकाळी सात वाजता नवीन नगर रस्त्याजवळील मच्छी सर्कलवरील शेरू इमाम शेख यांच्या माशाच्या दुकानासमोर अॅड. पठाण व त्यांच्या भावाला रस्त्यात गाठत कोथेता, लोखंडी गज टोच्या व बेसबॉलच्या दांडक्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.
उपचार घेतल्यानंतर रात्री जखमी अवस्थेत आहेत. पठाण यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे अधिक तपास करीत आहे.
Web Title: lawyer and his brother were assaulted due to an old feud
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App