धक्कादायक! चहात गुंगीचे औषध टाकून वकिलाकडून महिलेवर बलात्कार
Breaking News | Nashik Crime: रोजगाराचे आमिष दाखवून, चहात गुंगीचे औषध टाकून एका वकीलाने महिलेवर वारंवार अत्याचार (rapes) केल्याची घटना उघडकीस.
नाशिक : रोजगाराचे आमिष दाखवून, चहात गुंगीचे औषध टाकून एका वकीलाने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात ऍड संजय हरिप्रसाद कनोजी (रा. जेलरोड) यांच्याविरोधात बलात्कार, ऍक्ट्रॉसिटी, अवैध सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार 2019 पासून आतापावेतो बलात्कार केला व अवैध रित्या व्याज घेतले. पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिची संशयित ऍड कनोजी सोबत 2019 मध्ये ओळख झाली. पीडिता एकदा कामानिमित्त घरी गेली असता चहा मध्ये गुंगीचे औषध टाकून संशयिताने अत्याचार केला. तसेच अत्याचाराचे चित्रीकरण केले. त्यानंतर व्हिडीओ पती आणि मुलांना दाखवेल असे धमकावत संशयीताने वारंवार अत्याचार केला. कोरोना काळात पीडितेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय ठप्प झाल्याने संशयित संजय कनोजी याने पीडितेस नोकरीं देत २५ हजार रुपये कर्ज दिले. त्या पोटी पीडित महिलेकडून वकीलाने दरमहा एक हजार रुपये व्याज घेतले. तसेच पीडित महिलेच्या पतीच्या नावाने स्वतःचे बनावट आधार कार्ड बनवून त्याचा गैरवापर केला. संशयित वकील कनोजी हा वारंवार अश्लील व्हिडिओ पती व मुलांना दाखवण्याची धमकी देत अत्याचार करीत. तसेच जातीवाचक बोलून आणि अवैधरित्या व्याज वसूल केल्याप्रकरणी पीडीतेने संशयिता विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित वकिलास ताब्यात घेण्यात आले आहे.
Web Title: Lawyer rapes woman by putting gungy drug in tea
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study