Home महाराष्ट्र लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांना इशारा; म्हणाले, छगन भुजबळांवर….

लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांना इशारा; म्हणाले, छगन भुजबळांवर….

laxman Hake On Chhagan Bhujbal:  ओबीसी विरोधी भूमिका घेतं असतील तर आम्हाला विचार करावा लागेल.

Laxman Hake's warning to Ajit Pawar

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावल्यानंतर ते दररोज उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. छगन भुजबळांकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे.

मंत्रिमंडळातून छगन भुजबळांना डावलल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार ओबीसी विरोधी भूमिका घेतं असतील तर आम्हाला विचार करावा लागेल. छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होतं आहे. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर ओबीसींचा आवाज आहे. महायुतीने दोघांनाही डावलून काय संदेश दिला जातोय?, असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.

साहेबांना मंत्रिपद मिळाले पाहिजे या मताशी मी सहमत नाही.ओबीसीच्या अधिकाराचा प्रश्न, त्यांना मंत्रिमंडळ बाहेर ठेव्याचे म्हणजे ओबीसी आरक्षण संपविण्याचा प्रयत्न आहे. ही आमच्या अधिकारची लढाई आहे, साहेबांची नाही. तुम्ही आम्ही पेटून उठले पाहिजे…ओबीसींच्या जीवाशी तुम्ही खेळत असला तर ती चूक आहे, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करावा…राष्ट्रवादीच्या नादी लागू नका…तुम्ही ओबीसीचे राष्ट्रीय नेते आहेत. तुमच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही मागे येणार…, असं ओबीसी मोर्चाचे महासचिव राजेंद्र महाडोळे म्हणाले.

Web Title: Laxman Hake’s warning to Ajit Pawar

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here