अहिल्यानगर: मशीनमध्ये साडीचा पदर गुंतला; महिलेचा मृत्यू
Ahilyanagar Accident: वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेच्या साडीचा पदर मशीनमध्ये गुंतून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू.
अहिल्यानगर: वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेच्या साडीचा पदर मशीनमध्ये गुंतून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बोल्हेगाव उपनगरात घडली.
विजया अमोल गाडे (वय ३५ रा. बोल्हेगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजया या बोल्हेगाव शिवारातील बाळासाहेब वाकळे यांच्या शेतातील वीटभट्टीवर कामाला होत्या. त्या गुरूवारी (१९ डिसेंबर) सकाळी भट्टीवर असताना त्यांच्या साडीचा पदर मशीनमध्ये गुंतून अपघात झाला. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी तुषार वाकळे यांनी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉ. बटुळे यांनी त्यांची तपासणी केली असता त्या मृत झाल्याचे त्यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश शिंदे करत आहेत.
Web Title: layer of saree is involved in the machine Death of a woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study