Home Breaking News संगमनेरमध्ये अवैध दारु वाहतुकीवर एलसीबीची कारवाई

संगमनेरमध्ये अवैध दारु वाहतुकीवर एलसीबीची कारवाई

Breaking News | Sangamner Crime: अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा; १ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त.

LCB takes action against illegal liquor trafficking in Sangamner

संगमनेर: शहरामध्ये अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या चौघांवर रविवारी (दि. ३०) कारवाई करुन १ लाख ८९ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आगामी नगरपरिषद निवडणुका शांतता व भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेस अवैधरित्या दारु वाहतूक करणारे व विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, योगेश कर्डिले व महादेव भांड यांचे पथक तयार करून संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देऊन रवाना केले. या पथकाने शहरात अवैधरित्या दारु वाहतूक करणारे भाऊसाहेब सखाराम दळवी (वय ४० वर्षे रा. चिकणी, ता. संगमनेर) व वेदांत वाईन शॉपचे चालक / मालक यांच्याकडून विदेशी दारु व मोटारसायकल असा एकूण ८१ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तर नवनाथ भारत घोडेकर (वय ३०) व किरण गोरख घोडेकर (वय ३०, दोघेही रा. घोडेकर मळा, संगमनेर) यांच्याकडून देशी दारु व मोटारसायकल असा १ लाख ७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कारवाया मिळून पथकाने १ लाख ८९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Breaking News: LCB takes action against illegal liquor trafficking in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here