Home क्रीडा पठाण बंधूंची झुंज अपयशी; अटीतटीच्या सामन्यात Team India चा पराभव

पठाण बंधूंची झुंज अपयशी; अटीतटीच्या सामन्यात Team India चा पराभव

Team India

Legends League Cricket : ओमान येथे सुरू असलेल्या लिजेन्ड्स लीग क्रिकेटचा सहावा सामना गुरुवारी झाला. यात इंडियन महाराजा (Indian Maharaja) संघाचा वर्ल्डस जायंट्स (World Giants) संघाकडून मात्र 5 धावांनी निसटता पराभव झाला. या पराभवासह भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

नाणेफेक जिंकून इंडियन महाराज संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र वर्ल्ड जायनट्स संघाने 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 228 धावा उभ्या केल्या. यात हर्षल गिब्सने धमाकेदार 89 धावा केल्या तर फील मस्टर्डने देखील मोलाचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजीत मुनाफ पटेलने दोन फलंदाज बाद केले. इतर गोलंदाजांनी विशेष चमकदार कामगिरी केली नाही.

धावांचा मोठा डोंगर गाठण्यासाठी भारतीय संघाला सुरुवातीला मशागत करावी लागली. सुरुवातीलाच दोन गडी बाद झाल्या नंतर नमन ओझा आणि युसूफ पठाणने चौकार षटकारचा पाऊस पाडला. मात्र ठराविक वेळेच्या अंतरात युसूफ पठाण बाद झाला आणि त्या नंतर नमन ओझाही 95 धावा करून बाद झाला. यानंतर इरफान पठाण भारतासाठी आशेचे किरण बनला. स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक त्याने आपल्या नावावर केले. मात्र शेवटच्या क्षणी 56 वर खेळत असताना तो बाद झाला. 0त्यानंतर 5 चेंडूंत विजयासाठी आवश्यक असणाऱ्या 6 धावा कोणत्याही खेळाडूला काढता न आल्याने भारताला निसटता पराभव पत्करावा लागला. रायन जय साईडबॉटम आणि मॉर्न मोरकेलने दोन-दोन बळी टिपले.

भारताचा इंडिया महाराजा संघ या पराभवासह स्पर्धेतून बाद झाला असून उर्वरित दोन संघ वर्ल्ड जायनट्स आणि एशिया लायन्स हे अंतिम सामन्यात भिडणार आहेत. शनिवारी दोन्ही संघामध्ये स्पर्धेचा निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत तिन्ही संघ सरस ठरले आहेत. त्यामुळे उर्वरित दोघांपैकी विजेता कोण होणार याचा अंदाज बांधणे सोपे नाही.

Web Title : Legends League Cricket: Fighting of Pathan brothers fails; Team India lost in a close match

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here