संगमनेरात दारूचे दुकान फोडले, दारूसह रोकड लंपास
Sangamner Crime: अज्ञात चोरट्याने दारूचे दुकान फोडून ७१ हजार ६६० रुपयांच्या दारूच्या बाटल्या आणि १५ हजार रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना.
संगमनेर : शहरातील अरगडे गल्ली येथे अज्ञात चोरट्याने दारूचे दुकान फोडून ७१ हजार ६६० रुपयांच्या दारूच्या बाटल्या आणि १५ हजार रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील अरगडे गल्लीमध्ये असलेल्या हॉटेल वाईन स्पॉट या दारूच्या दुकानात बुधवारी रात्री व्यवस्थापकांनी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर हा प्रकार घडला. गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी व्यवस्थापक आले असता, दुकानाचे शटर मध्यभागी उचकटलेले दिसले. दुकानाच्या आत जाऊन पाहणी केली असता गल्ला फोडलेला आढळून आला, तसेच रॅकवरील विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या गायब होत्या. चोरट्याने ७१ हजार ६६० रुपयांच्या दारूसह १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच दुकान मालकांनी तात्काळ पोलिसांत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अशोक पारधी करत आहेत. घटनेमुळे अरगडे गल्लीतील व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, चोरीमागील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न शील आहेत.
Web Title: liquor shop was broken into in Sangamner cash and liquor looted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News