शिंदे गटाचे शिर्डी मतदार संघातून यांची उमेदवारी, आठ उमेदवार जाहीर
Lok sabha Election 2024: लोकसभा मतदार ८ पैकी ७ खासदारांना पुन्हा संधी
मुंबई: महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा आल्या ? हा प्रश्न अनुत्तरित असताना गुरुवारी शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत विद्यमान १३ खासदारांपैकी सात खासदारांना संधी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली असून बहुचर्चित ठाणे आणि नाशिक निर्णय गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. शिंदे यांनी पहिल्या यादीत कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीचा समावेश केला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
८ पैकी ७ खासदारांना पुन्हा संधी
पहिल्या यादीत श्रीकांत शिंदे यांचेही नाव नाही. भाजपने कालपर्यंत २४ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असताना शिंदे गटाने काल आपल्या आठ उमेदवारांची नावे जाहीर केली. या आठपैकी पाच लोकसभा मतदारसंघांत लढती रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महायुतीत लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. जागावाटप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः दिल्लीत एकनाथ गेले होते. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांसोबत चर्चा होऊनही महायुतीत जागावाटपाचा पेच कायम होता. हा पेच कायम असताना भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याचा सपाटा लावला होता. भाजपने शिंदे गटाचा दावा असलेल्या अमरावतीच्या जागेवर खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करून आणखी आघाडी घेतली होती. अशातच भाजपकडून ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, यवतमाळ-वाशिम या शिंदे गटाच्या जागांवर हक्क सांगितला जात आहे. भाजप सातारा लोकसभेची जागा आपल्याकडे घेऊन नाशिकची जागा अजित पवार गटाल देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे गॅसवर आहेत.
भाजपने ठाण्याच्या जागेसाठी जोर लावला आहे. याशिवाय भाजपने कल्याणच्य जागेवर मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपूत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी मान्य केल आहे. मात्र, शिंदे गट आणि भाजपमध्ये ठाण्याच्या जागेवर अद्याप रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदे विधानसभेत ज्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघान प्रतिनिधित्व करतात तो मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो. त्यामुळे शिंदे गट ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडायला तयार नाही. परिणामी डो श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा रखडल्याचे समजते.
शिंदे यांची लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांशी होणार आहे. जून २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट प्रथमच निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकले असून या
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार
दक्षिण मध्य मुंबई: राहुल शेवाळे, कोल्हापूर संजय मंडलिक, शिर्डी सदाशिव लोखंडे, बुलढाणा प्रतापराव जाधव, हिंगोली हेमंत पाटील, मावळ श्रीरंग बारणे, रामटेक राजू पारवे, हातकणंगले : धैर्यशील माने.
ठाकरे गट विरूद्ध शिंदे गटाच्या लढती
दक्षिण मध्य मुंबई: अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे शिर्डी : भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे बुलडाणा : नरेंद्र खेडेकर बिरुद्ध प्रतापराव जाधव
Web Title: Lok sabha Election Shinde group’s candidature from Shirdi constituency
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study