ज्या जागा मिळतायेत, त्या पदरात पाडून घ्या, नाहीतर…; बड्या नेत्याचा अजित पवारांना खोचक टोला
Loksabha Election: विनायक राऊतांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर प्रतिक्रिया, लोकसभेचे रणसंग्राम सुरु झाल्याने टीका टिप्पणी सुरु झाली आहे.
सिंधुदुर्ग: पुढच्या आठवडाभरात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकतो. अशात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. अशात राष्ट्रवादी अजित पवार गटाला किती जागा मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे. अशात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. जे मिळतंय ते पदरात पाडून घ्या. नाहीतर ते सुद्धा मिळणार नाही, असं विनायक राऊत यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत येण्याची शक्यता आहे. तशा बैठका होत आहेत. यावर ही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी आंबेडकरांचा पूर्ण सन्मान राखण्याचा प्रयत्न करेल. तिन्ही पक्षाकडून त्यांच्या पक्षाला ज्या जागा देणं शक्य होईल. ते देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते सध्या दमनशाही विरोधात लढा देत आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असं म्हणत विनायक राऊतांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर प्रतिक्रिया दिली.
रामदास कदमांनी घरचा आहेर दिला नाही. तर त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर काढून टाकली आहे. उद्धव ठाकरेंसोबत गद्धारी करून भाजपाचे तळवे चाटन्याचे परिणाम आता त्यांना दिसू लागले आहेत. ना घरका ना घटका अशी अवस्था सर्वांची होणार आहे. त्यांना वनवासात जावे लागणार आहे. शिंदे गटाच भवितव्य आता काही दिवसांपुरत राहील आहे, असं म्हणत विनायक राऊत यांनी रामदास कदमांना टोला लगावला आहे.
Web Title: Loksabha Election Demolish the places you get, otherwise
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study