निलेश लंके मोठ्या मताधिक्याने निवडून येणार – बाळासाहेब थोरातांना विश्वास
Breaking News | Ahmednagar Lok Sabha Election: निलेश लंकेंना जर महाविकास आघाडीतून अहमदनगर दक्षिणसाठी उमेदवारी मिळाली तर डॉ. सुजय विखे पाटलांना तगडे आव्हान असणार आहे.
Dr Sujay Vikhe Patil Vs Nilesh lanke: भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 20 जणांचा समावेश आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने निलेश लंकेंनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
अहमदनगर दक्षिणमध्ये विखे पाटलांच्या पक्षांतर्गत वैरी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. कर्जत जामखेडमधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे लंके यांना अधिक मताधिक्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे आमदार असल्या तरी राष्ट्रवादीचा विरोधी गट देखील कमालीचा सक्रीय आहे. भाजपचे आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे उघडउघड लंके यांना मदत करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे. यामुळे जर लंके विरुद्ध विखे लढत झाल्यास लंके विखेंना तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब थोरात यांचे मत:
तसेच, विखे पाटलांचे कट्टर विरोधक मानले जाणारे बाळासाहेब थोरात हे नाशिकला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, निलेश लंके जर शरद पवार गटात आले आणि ते अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढले तर त्यांचा निश्चितच विजय होईल. निलेश लंकेंनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. सर्वसामान्य तरुण, काम करणारे तरुण असे त्यांचे उदाहरण झालेय. लंके मोठ्या मताने विजयी होतील, अशा मला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात यांचादेखील लंकेंना विजयी गुलाल उधळण्यासाठी हातभार लागणार आहे. आता महाविकास आघाडीतून निलेश लंकेंना अहमदनगर दक्षिणसाठी तिकीट मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Web Title: Lok Sabha Election Nilesh Lanka will be elected with a large majority Balasaheb Thorat
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study