Home महाराष्ट्र लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, आता…….मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, आता…….मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Ladaki Bahin Yojana: विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही, सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा.

Lottery for beloved sisters, Chief Minister's big announcement

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करतानाच त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे. तसेच  कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही, सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार,लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.   ‘गुलाबराव पाटील साहेब आता आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष द्या, वीस नोव्हेंबरला विरोधकांच्या बुडाखाली फटाके फोडायचे आहेत. 23 नोव्हेंबरला ऑटोम बॉम्ब फोडायचा आहे. चंद्रकांत पाटील बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये पाच हजार कोटींचा निधी दिला आहे, असं यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हफ्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. कोणिही ही योजना बंद पाडू शकणार नाही. सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार,लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सुशिक्षित बेरोजगारांना आपण पैसे देवू लागलो आहोत, सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, त्यामुळे नुकसान झालं तर त्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. चंद्रकांत पाटलांना पन्नास हजारांपेक्षा जास्तीची लीड मिळाली पाहिजे, महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना विजयी करा, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. निवडणुकीचे वारे जोराने वाहताना दिसत आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर अनेक योजनांचा पाउस पडत आहे.

Web Title: Lottery for beloved sisters, Chief Minister’s big announcement

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here