Home क्राईम लव्ह मॅरेज करून दोन मुलांची आई होती, तरीही दुसऱ्याच्या प्रेमात पडली, पती...

लव्ह मॅरेज करून दोन मुलांची आई होती, तरीही दुसऱ्याच्या प्रेमात पडली, पती प्रेमात अडसर ठरत होता म्हणून…

Kasarsa Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच आपले कुंकू पुसल्याचे (Murder) धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह कासारा घाटात फेकून दिला. या घटनेने खळबळ उडाली आहे.  

कसारा : काही वर्षांपूर्वी जुन्नर भागातील सुशील कोथेरे याच्यासोबत कोमल कोथेरे हिचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर त्यांना दोन लहान मुलं होती. गुण्या गोविंदाने त्यांचा संसार सुरू होता. त्याच काळात कोथेरे दाम्पत्याचे नातेवाईक कल्याण येथे राहत असल्याने त्यांचे येणे जाणे होते. अशातच भाजीपाला विक्री करणारा मनुकुमार त्रिलोकनाथ खरवार आणि कोमल यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झाले. कोमल त्याच्या प्रेमात वेडी झाली. तिने माहेरी जाऊन येते सांगून थेट कल्याण गाठलं आणि भाड्याने घर घेऊन मनुकुमार सोबत राहू लागली. त्यामध्ये सुशील याने तपास केला असता आपली पत्नी कल्याण येथे राहत असल्याचे लक्षात आले आणि त्याने पत्नीची समजूत काढून तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

याच काळात कोमल आणि मनुकूमार यांच्यात प्रेम संबंध असल्याचे सुशील कोथेरे च्या लक्षात आले. त्याने वाद घातला. याच काळात कोमल आणि मनुकुमार यांनी सुशीलला मारहाण सुरू केली. यामध्ये सुशील बेशुद्ध झाला होता.

मनुकुमार याने आपल्या मित्रांच्या मदतीने नाशिकच्या दिशेने सुशीला गाडीत टाकून आणले. तिथेच त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार केले त्यामध्ये सुशीलचा मृत्यू झाला आणि त्याला कासारा घाटात फेकून दिले होते

जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याला मृतदेह आढळून आला. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मृत्यूची नोंद करून घेतली होती. मात्र, मृतदेहाची ओळख पटत नसल्याने गुन्हा उघडकीस आला नाही.

याच काळात सुशीलची लहान मुलीला आपल्या वडिलांची आठवण येत असल्याने मोठ्या मुलीने आज्जीला फोन करून विचारणा केली. पप्पा तिकडे आले आहे का ? आज्जीने याबाबत सर्वत्र चौकशी केली मात्र न मिळाल्याने कल्याण पोलिस स्टेशन गाठले.

त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाच्या संदर्भात असलेले कपडे आणि इतर बाबींवर आपल्याच मुलांचा मृतदेह आजीने ओळखला आणि मुलाची हत्या झाल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर प्रियकरांच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केल्याची बाब समोर आली.

यामध्ये कसारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पती आणि प्रियकर यांना अटक करण्यात आली असून इतर साथीदार फरार आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: love marriage, but still fell in love with someone else, as her husband Murder

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here